Parbhani : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय जाधव सध्या एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार जाधव यांनी खरेदी केलेली महागडी, आलिशान 'लँड रोव्हर डिफेंडर' (Defender) ही लक्झरी SUV सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेषतः या गाडीच्या '७४७७' या व्हीआयपी क्रमांकाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असून यावर जोरदार चर्चा रंगली आहे.
.
#SanjayJadhav #mpsanjayjadhav #bandujadhav #sanjayjadhavcar #iblisnews