
जिजाऊ संस्थेचा कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटपाचा संकल्प;
अंबरनाथ विभागात जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण
कल्याण पूर्व ग्रामीण भागात
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व जिजाऊ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण पूर्व/ अंबरनाथ ग्रामीण विभागात विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
जिजाऊ संस्थेचे संस्थापक तथा ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यापक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये, या उद्देशाने वह्यांचे वाटप केले जाते.
अंबरनाथ विभागातील नियोजित कार्यक्रमानुसार:
सकाळी १०.३० वाजता: जि.प. शाळा पोसरी येथे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
सकाळी ११.४५ वाजता: जि.प. शाळा कुंभार्ली येथे विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या.
या व्यतिरिक्त वाडी, जि.प. शाळा न्हारेन, जि.प. शाळा पाली, जि.प. शाळा चिरड आणि जि.प. शाळा शेलारपाडा या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप उत्साहात पार पडले. वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
या प्रसंगी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी ॲड. अक्षय काठवले,नेताजी दाभणे, उपसरपंच विजय काठवले आणि पत्रकार संदेश दाभणे यांच्यासह शाळांचे शिक्षक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Kalyan, Thane | Oct 7, 2026