मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक चिपळूण–कराड मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना, एका संशयित वाहनाची तपासणी केली. सदर वाहनामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी आरोपीच्या ताब्यातून वाहनासह एकूण रु. 10,15,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #drugsfreemaharashtra #ratnagiri #ratnagiripolice