Public App Logo
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणी हमालावर धारदार शस्त्राने हल्ल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; नगरसेवक प्रतीक पेणकर यांचे पोलीस उपायुक्तांना निवेदन कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करून सक्षम अधिकारी व पुरेसे पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच सकाळ-सायंकाळच्या पीक अवरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करावे, अशी मागणी नगरसेवक व शिक्षण मंडळ सदस्य प्रतीक प्रकाश पेणकर यांनी केली आहे. यासंदर्भात पेणकर यांनी परिमंडळ-३, कल्याणचे पोलीस उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे. कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, या परिसरात गर्दुल्ले, अमली पदार्थांचे सेवन करणारे, संशयित व्यक्ती व समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिक, महिला, विद्यार्थी आ� - Kalyan News