
बेंगळुरू पोलीस व सीबीआय, नवी दिल्ली येथील अधिकारी असल्याचे भासवून एका इसमास त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा, मुंबई येथील खात्यामधून 3 कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची भीती दाखविण्यात आली. तसेच त्यांना "डिजिटल अरेस्ट" करण्यात आल्याचे सांगून आरोपींनी एकूण ₹1,23,00,000/- रकमेची फसवणूक केली.
सदर गुन्ह्याचा तपास करताना रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से) यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली.
रत्नागिरी पोलीसांचे नागरिकांना आवाहन : पोलीस, सीबीआय, ईडी किंवा इतर कोणतीही सरकारी यंत्रणा "डिजिटल अरेस्ट" करत नाही. अशा फसव्या कॉल्स, व्हिडिओ कॉल्स किंवा संदेशांना बळी पडू नये. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन 1930 , रत्नासेतू चॅटबॉट (9371415612) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. CMOMaharashtraDevendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #cybersecurity #cybercrime #ratnagiri #RatnagiriPolice