🏰 रत्नागिरी पोलीस दलाकडून ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता व संवर्धन मोहीम.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या आदेश व मार्गदर्शनखाली जिल्ह्यात विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत गड-किल्ल्यांच्या परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व कचरा निर्मूलन तसेच वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range s #maharaj #HistoricFort #ratnagiri #RatnagiriPolice
22 views | Ratnagiri, Maharashtra | Jun 14, 2026