
आज दुपारी भावाची आठवण येते म्हणून स्टेट्स ठेवले; आज निघून गेलास..
जिवलग मित्र श्रीनिवास टिळे सर यांचे अपघाती निधन मित्रा भावपुर्ण
श्रद्धांजली.. हात थरथरता मित्रा हे लिहायला..
आज तुझा भावाचे याच दिवशी हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते, भावाची आठवण येते म्हणून तू स्टेटस ठेवले आणि न सांगता सर्वांना सोडून गेलास...
खूपच वेदनादायक प्रसंग आहे... काय आणि कसं सांगू काही कळेना..
मित्रा.. आपण चार जण माजलगावचे एकाच Ded कॉलेजला नंबर लागला. त्यात मी,सचिन उजगरे, संदेश फुके, श्रीनिवास टिळे नशिबाने एकाच रूम मध्ये चार वर्ष काढले, आई वडिलांनी गावाकडून मुरमूरच्या चिवडा, काही फराळाचे आणले तर सर्वांना एकत्रीत बसून खाऊ घालायचा, कॉलेज मधे कोणी काही बोलला की, अगोदर समोर तोंड द्यायचा.. मित्रा साठी काही पना करायची तयारी असायची... थंडीच्या दिवसात एखाद्या मित्राच्या अंगावर काही नसले तर स्वतः उठून अंगावर टाकायचा, एवढी काळजी मित्रा तू घेत होतास.. तुझ्या एक एक आठवणींनी डोळयात पाणी येते बघ.. तू अचानक सोडून गेलास.. एका ताटात चार वर्षे चार जण जेवत राहिलोत.. मेस वर तर जे पदार्थ आवडले की, ताटातून तू.. दही ओढून घ्यायचा... तू खरंच आम्हाला सोडून निघून गेलास.. विश्वास बसत नाही मित्रा.. तुझे प्रेमाची हाक असायची सुभ्या, सच्चा, संध्या,pavya, मित्रा ही हाक केवळ जीवलग मित्रच मारू शकतो.. तुझा स्वभाव असा होता की, ज्याच्या संपर्कात आलास, त्याला तू आपल्यास करायचा.. श्रीनिवास तू आयुष्यात जरी काही कमवले नसले तरी आज तू मित्र कमवले आहेस.. आयुष्यात तू सतत हसत खेळत राहिलास.. बिनधास्त राहिलास, मित्रा तुझ्या आठवणी विसरणे कठीण आहे.. शेवटी भावपुर्ण श्रद्धांजली मित्रा... श्रीनिवास..