मिशन फिनिक्स अंतर्गत चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. सदर इसमाची चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीच्या ताब्यातील गांजा व वाहन असा एकूण ₹1,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने केली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #saynotodrugs #missionphoenix #ratnagiri #ratnagiripolice