जालना: जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांनी दक्षता बाळगावी, 31 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट जारी..
आज दिन
Jalna, Jalna | Mar 30, 2026 जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा; नागरिकांनी दक्षता बाळगावी, 31 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट जारी.. आज दिनांक 30 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.