जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने दि. 27 जानेवारी 2026 पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला धर्मवीर छावा संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ह.भ.प. कारभारी अंभोरे हे न्यायाच्या मागणीसाठी उपोषणास बसले असून त्यांच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक असल्याचा दावा संघटनेने केला आहे.याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.जिल्ह्यातील शेतकर्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन दिली.