पालघर: मनोर- मस्ताननाका परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून चोरटा झाला पसार
पालघर तालुक्यातील मनोर-मस्ताननाका परिसरात मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली आहे. दुर्वेस येथील अमृता दळवी दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरटा दुचाकीवरून आला आणि अमृता दळवी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरटा पसार झाला. तब्बल साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले असून या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.