पालघर: राष्ट्रीय महामार्गावर मनोर ते चिल्हार फाटा परिसरात वाहतूक कोंडी
मुंबई- आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर मनोर ते चिल्हार फाटा परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी, वाहन चालक, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.