पालघर: मेढ्याचापाडा- जव्हार येथे तरुणाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला जव्हार पोलिसांनी केली अटक
पालघर जिल्ह्यातील मेढ्याचा पाडा जव्हार येथे एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्यांच्या कडेला फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत तरुणाचे मालनवती दिघे हिच्यासोबत लग्नापूर्वीचे प्रेम संबंध होते. तिचा पती दिपक हा मृत तरुण सोमनाथ दिघे व पत्नीवर संशय घेत होता. पतीने तरुणाचा काटा काढण्याचा व पतीने, पत्नीच्या मदतीने तरुणाची हत्या केली. याप्रकरणी आरोपी दिपक दिघे व त्याची पत्नी मालनवती दिघे या दोघांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे.