पेण: यंदा खरिपाच्या पेरण्यांची घाई नको; कृषी तज्ज्ञांचे आवाहन
Pen, Raigad | May 14, 2026 जगभरात एल निनोची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. एल निनोचा कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असून यंदा खरिपातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. राज्यात सात जूनपासून मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे मेपासून खरिपाच्या हंगामाची तयारी सुरु होते. पूर्वी हवामान मोठा फरक पडत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे वेळपत्रक ठरलेले होते.