हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याच्या रागातून सहा जणांनी हॉटेलची तोडफोड करीत आचारीवर हल्ला करून त्याला लोखंडी झाऱ्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेबारा वाजता चाकण येथील चौधरी हॉटेलमध्ये घडली.बलदेवकुमार सुभाष चंदेर (वय २४, रा. चौधरी स्टेशन, कोहिनुर सेंटर, तळेगाव चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे जखमीचे नाव आहे.