पालघर: जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोईसर येथील भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची घेतली होती
पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची बोईसर येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. यावेळी बोईसर परिसरातील नागरी, औद्योगिक व सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे बोईसर मंडळातील जिल्हा पदाधिकारी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.