पालघर: कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून नागरिकांनी सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, सतर्क रहावे; खासदार डॉ. हेमंत सवरांचे आवाहन
युद्धजन्य व आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. पालघर जिल्ह्यात देखील पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट आल्यास असे मेसेज फॉरवर्ड करू नये त्याची माहिती पोलिसांना द्यावी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.