गोवंडी बैगनवाडी इंद्रानगर परिसरातील झोपड्यांना लागली भीषण आग, २५ ते ३० झोपड्या जळून खाक
गोवंडी बैगनवाडी मधील इंद्रानगर परिसरात मध्यरात्री झोपड्यांना भीषण आग लागली. आगीत २५ ते ३० घरे जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० हुन अधिक गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यात जीवितहानी झाली नसून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरू आहे.