घाटकोपर पंतनगर मध्ये रेल्वे पोलिस पत्नी बसल्या उपोषणाला
घाटकोपर पंतनगर येथील रेल्वे पोलीस वसाहतीतील रेल्वे पोलीस पत्नीने आपले हक्काचे घर मिळण्यासाठी आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी घाटकोपर रेल्वे पोलीस वसाहतीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे यावेळी वसाहतीतील रेल्वे पोलीस पत्नी मोठ्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले आहेत आम्हाला आमचे हक्काचे घर मिळालेच पाहिजे अशा रेल्वे पोलीस पत्नीच्या मागण्या आहेत