घाटकोपर मध्ये फेरीवाल्यांची मुजोरी पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मुंबई मध्ये फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली असून त्याच्या पुढे आता पालिका आणि पोलीस प्रशासन हतबल झाल्यासारखे दिसत आहेत.घाटकोपर रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांची तक्रार केली म्हणून हॉटेल चालकाला धमकावून हॉटेल ची तोडफोड केली आहे.ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली आहे.तर या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी काल दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहे