मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात २३ कुटुंबांना पडघ्याजवळ असणाऱ्या जमिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या परत
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ कुटुंबांना पडघ्याजवळील जमिनी परत केल्या. १९७८ साली मुंबई-नाशिक महामार्गवरील पडघ्याजवळ या कुटुंबांना ८० एकर पेक्षा अधिक जमीन देण्यात आली होती. गेल्या ४६ वर्ष सदर कुटुंब जमिनीपासून वंचित होते.