जाफराबाद: धावडा वनक्षेत्रात मोठी अवैध वृक्षतोड - आ.संतोष पाटील दानवेनी मुंबई विधान भवन अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न
आज दिनांक 9 जुलै 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11: 33 ला भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील धावडा येथे व जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे, ही वृक्षतोड वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी व कडक कायदा करावा जेणेकरून वृक्षतोड होणार नाही ,अशी मागणी त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत केली आहे.