पोलादपूर: प्रशासनाकडून १५ गावांच्या पाणी टंचाई निवारण आराखड्याला गती
पोलादपूर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी देवळे धरण प्रकल्पाच्या कामाची राज्याचे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रत्यक्ष स्थळावर 3 मे रोजी सायंकाळी उशिरा जाऊन सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याच्या तसेच गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. देवळे, करंजे, नाणेघोळ, पितळवाडी, चाळीचा कोंड, वाकण, घागरकोंड अशा डोंगराळ भागातील गावांमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा तीव्र तुटवडा भासत होता.