इंदिरानगर भागातील कसाई वाडा, वडाळा नाका येथे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या व मास विक्री बंदी असतानाही कायद्याचे उल्लंघन करून गोमास विक्री करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.नासिर कयूम शेख, अब्दुल रहीम कुरेशी, सईद मजीद कुरेशी, हसनैन अफरोज कुरेशी, अफरोज बिस्मिल्ला कुरेशी व रहीम अब्दुल्ला कुरेशी हे प्रतिबंधित असलेले गोमास विक्री करताना पोलिसांना निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.