20 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतापनगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धडाकेबाज कार्यवाही करत बीएसएनएलचे क्रोन चोरी टोळीचा पर्दा फाश केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे.