📌 नांदेड: २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; ३.८८ लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट!
785 views | Nanded, Maharashtra | Jun 12, 2026 नांदेड जिल्ह्यात आगामी २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. माननीय अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात एकूण ३,८८,५२६ बालकांना डोस दिला जाणार असून २,८४३ बूथ तयार करण्यात आले आहेत. तसेच १६ जून ते ३१ जुलै या काळात बालकांचे अतिसारापासून रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात 'स्टॉप डायरिया' मोहीम आणि व्यापक जनजागृती राबवण्यात येणार आहे. या बैठकीला डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. संजय पेरके यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने सर्व माता-पित्यांना आपल्या ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस पा