समुद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी तालुकाध्यक्षपदी नारायण नवघरे यांची निवड
समुद्रपुर शहरातील युवा कार्यकर्ते नारायण नवघरे यांची आज सोमवारी सायंकाळी ८ वाजता झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ओबीसी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, जिल्हाध्यक्ष सूनील राऊत , श्री नितेश कराळे ( गुरूजी) प्रशांत भाऊ घवघवे, महेशभाऊ झोटिंग ,अशोकराव वांदीले आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी नारायण नवघरे यांनी या नियुक्तीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्याचे आभार व्यक्त केले.