हिंजवडीत 'रोड रेज ; "कार फोडली म्हणून थेट अंगावर घातली गाडी"; दुचाकीस्वार गंभीर...
.
.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ९:३५ च्या सुमारास मारुंजी लिंक रोडवर एका दुचाकीस्वार आणि पांढऱ्या रंगाच्या 'स्विफ्ट डिझायर' (Swift Dzire) कार चालकामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात दुचाकीस्वाराने कारची तोडफोड केली. या तोडफोडीनंतर कार चालक प्रचंड संतापला आणि त्यातूनच रस्त्यावर सुरू झाला एका 'हाय-स्पीड' पाठलागाचा थरार! कार चालकाने दुचाकीस्वाराचा विप्रो सर्कलच्या दिशेने तीव्र वेगाने पाठलाग सुरू केला.विप्रो सर्कलजवळ पोहोचताच कार चालकाने मागे-पुढे न पाहता आपल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारवर जाऊन आदळला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. धक्कादायक बाब म्हणजे, धडक दिल्यानंतर कार चालकाने गाडी न थांबवता, मानुसकीला काळिमा फासत कॅपजेमिनीच्या (Capgemini) दिशेने भरधाव वेगाने पसार होणे पसंत केले.या संपूर्ण घटनेमध्ये दोन्ही बाजूंची मोठी चूक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रथम दुचाकीस्वाराने कायदा हातात घेऊन कारची तोडफोड केली आणि त्यानंतर कार चालकाने सूडबुद्धीने थेट जीवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीला धडक देऊन 'हिट-अँड-रन'चा गुन्हा केला. या घटनेचा एक स्पष्ट व्हिडिओ सध्या उपलब्ध असून, त्यामध्ये वाहनांचे नंबर आणि संपूर्ण थरार कैद झाला आहे.जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. आयटी पार्कमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नोकरदार आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी उपलब्ध सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे फरार कार चालकाचा शोध सुरू केला असून, या प्रकरणी दोन्ही बाजूंवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
.
.
.
#Hinjawadi #PuneNews #RoadRage #HitAndRun #PuneCrime #WiproCircle #MarunjiRoad #PunePolice #BreakingNewsPune #AccidentUpdate #HinjawadiITPark #CrimeNews #MaharashtraPolice
Haveli, Pune | Jul 2, 2026