पोलादपूर: रायगडमधील 300 गाव-वाड्यांना 64 टँकरद्वारे पाणीपुरवठा
रायगड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 18 मे 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 64 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 64 गावे व 230 वाड्यांमधील 1 लाख 13 हजार 709 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.