व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पत्रकारावर दबाव; शिवीगाळ आणि धमकीप्रकरणी वकिलाविरुद्ध गुन्हा...
.
.
पुणे, ता. ३ : शिरूर तालुक्यातील एका पत्रकाराला सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला व्हिडिओ हटविण्यासाठी दबाव टाकत अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारितेचे कामकाज करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या प्रकरणात करण्यात आला आहे.
याप्रकरणी तेजस रामदास फडके (वय ४५, रा. शिंदोडी, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲड. विकास कुटे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
.
.
#PressFreedom #JournalistSafety #CrimeNews #BreakingNews #MaharashtraNews #PoliceAction #MediaUnderAttack #FreedomOfSpeech #JournalismUnderAttack #PressFreedom #CrimeNews #MaharashtraPolice
Haveli, Pune | Jun 3, 2026