श्रीवर्धन: श्रीवर्धनचे नगराध्यक्ष अतुल चौगुले यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
श्रीवर्धन नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष अतुल अरविंद चौगुले हे ठाकरे गटाला 'राम राम' करुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादीला धोबीपछाड देत, शिवसेना ठाकरे गटाकडून अॅड. अतुल चौगुले हे नगराध्यक्षपदाची निवडणूक विजयी झाले होते. या निवडणुकीत ठाकरे गटाकडून त्यांच्या प्रचारासाठी कोणीही मोठा नेता फिरकला नव्हता; मात्र शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी त्यांना मदत केली होती.