पेण: खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांना लागली पावसाची आस
Pen, Raigad | Jun 6, 2026 मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतरही खाडीपट्टयात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जून महिन्याची 5 तारीख उलटली, तरी भात शेतीच्या पेरणीसाठी आवश्यक असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आकाशाकडे टक लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन लांबणीवर टाकावे लागत आहे. खाडीपट्टयातील भात शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पावसानंतर शेतकरी बांधावर येतात. नांगरट, वखरणी करून भाताच्या रोपांसाठी बीजप्रक्रिया केली जाते.