जाफराबाद: नळविहीरा येथे अचानक आग लागून मकाच्या गंजीसह शेडनेट व शेती अवजारे जळून खाक
आज दि.27 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद ता नळ विहीरा येथे काल दि.26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 2वाजेच्या सुमारास शेतकरी भागवत पांडुरंग मोरे व एकनाथ विश्वनाथ मोरे यांच्या शेतात अचानक आग लागून मकाच्या गंजीसह शेडनेट व शेती अवजारे जळून खाक झाली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाने पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.