जाफराबाद: जंजाळवाडी शिवारात प्रसिद्ध मिरची व्यापारी शेख मोहसीन यांची चोरट्यांकडून हत्या
आज दिनांक 27 मे 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद शहरातील सिद्धार्थ नगर चिखली रोड परिसरात रात्री 2 वाजता घरासमोर उभी असलेली बुलेट चोरटे चोरून घेऊन जात असताना बुलेटचा मालक शेख मोहसीन यांच्या निदर्शनात ही बाब आली व त्यांनी व त्यांच्या पुतण्यांनी या चोरट्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली यावेळी जांजाळवाडी परिसरात या चोरट्यांना त्यांना अडवला असता चोरट्यांनी धारदार शास्त्राने वार करत शेख मोहसीन यांची हत्या केली आहे,तर त्यांचा पुतण्या जखमी झाला आहे.