कर्जत: राजनाला सिंचनाखालील हंगामी भातशेतीच्या क्षेत्रात वाढ
Karjat, Raigad | May 24, 2026 कर्जत तालुक्यातील राजनाला सिंचनाखालील भात शेतीचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. कर्जत तालुका हा भात शेतीसाठी ओळखला जातो. येथे पावसाच्या पाण्यावर तसेच राजनाला च्या पाण्यावर दुबारभात शेती केली जाते. मात्र मागील काही वर्षात अवकाळी पाऊस, शेतमजुरांची कमतरता तसेच अन्यकारणामुळे भात शेती काही प्रमाणात दुर्लक्षित झाली होती.