शहादा: लक्कडकोट येथे साडीच्या दुकानात चोरी, म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथे एका साडीच्या दुकानात चोरी झाल्याची घटना १८ मार्चला सकाळी घडली. चोरट्यांनी महुवा साडी सेंटरचे कुलूप तोडून ७ हजार २०० रुपयांच्या नऊ नऊवार साड्या, २ हजार १५० रुपये किमतीचे ६० वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज आणि १० हजार रुपयांची रोकड असा एकूण १९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.