शहादा: एसटीच्या वाहकाचा कौटुंबिक कारणातून खून, मुंबई येथून चार जणांना अटक, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांची पत्रपरिषदेत माहिती
नांदर्डे ते तऱ्हावद रस्त्यावर शहादा येथील एसटी वाहकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या दोन दिवसात गुन्हा उघड करून मुंबईच्या कांदिवली येथून संशयित चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे.असे एकूण सहा जण असून त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर खून कौटुंबिक कारणातून कट रचून झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.