शहादा: अपघातातील जखमी झालेल्या रुग्णांची खासदार डॉ.हिना गावित व लोकप्रतिनिधींनी केली नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विचारपूस
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील भावीकांचा देवमोगरा मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पिकअप वाहनाचा एक्सल तुटल्याने वाहन पुलाखाली कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले. जखमी रुग्णांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार हिना गावीत, डॉक्टर विक्रांत मोरे, बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे, आमदार काशिराम पावरा आदींनी भेट देऊन जखमींची असते चौकशी करून विचारपूस केली.