हिंगणा: हिंगणा येथील खत टंचाई; कृषी केंद्रांची तपासणी मोहीम
Hingna, Nagpur | Apr 27, 2026 हिंगणा : तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी महसूल व कृषी विभागाच्या वतीने कृषी केंद्रांची संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे.तहसीलदार नितीन गोहणे यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी शिवाजी सरनाईक व तालुका गुणनियंत्रण अधिकारी अनिल चावरे यांनी गुरुदेव कृषी सेवा केंद्र व पवन अॅग्रो ट्रेडर्ससह विविध कृषी केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.