जाफराबाद: जाफराबाद छत्रपती संभाजीनगर बस सेवा सुरू झाल्याने जवखेडा ठोंबरे येथे ग्रामस्थांनी केला वाहकाचा व चालकाचा सत्कार
आज दिनांक 2 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद ते छत्रपती संभाजीनगर बस सेवा सुरू झाल्याने देवघरात ठोंबरे येथे समस्त गावकऱ्यांनी वाहकाचा व चालकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,विद्यार्थ्यांची, वृद्धांची येण्या जाण्याची व्यवस्था झाली आहे,ही बस जाफराबाद,छत्रपती संभाजी नगर, माहोरा, बरंजळा,नळणी, जवखेडा,केदारखेडा, राजुर,दाभाडी या मार्गे जाणार असल्याने सकाळीच या बसची व्यवस्था झाल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहे.