पालघर: पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त
पाकिस्तान कडून देशात भ्याड हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस दल देखील सतर्क झाले आहे. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील 38 लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. किनारपट्टी लगतच्या सर्व तपासणी नाक्यांवर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.