पालघर: पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात 9 मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.