पालघर: कामण परिसरात जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
नायगाव पोलीस ठाणे हद्दीत जुगार खेळणाऱ्या व खेळणाऱ्या चौघां विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कामण परिसरातील यात्रेत सार्वजनिक रस्त्याच्या कडेला जुगार खेळणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. रुपेश मात्रे, विनाय कासार, यश चौधरी, प्रशांत मुकादम या चौघांवर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नायगाव पोलीस करीत आहेत.