पालघर: राष्ट्रीय महामार्गावर तलासरी परिसरात ट्रक आणि दुचाकीची धडक; एकाचा मृत
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुंबई वाहिनीवर बंद अवस्थेत एक ट्रक उभा होता, या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून इमरान शेख असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे.