पालघर: आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत वसई तहसील कार्यालय येथे मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत वसई तहसील कार्यालय येथे मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मच्छीमारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, मच्छीमार प्रतिनिधींनी आपल्या समस्या यावेळी आमदारांसमोर मांडल्या. त्याचप्रमाणे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री यांच्याकडे बैठक घेण्याच्या नियोजना संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत वसई विधानसभा क्षेत्रातील मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.