पोलादपूर: रायगडातील सर्वच रस्ते बनलेत मृत्यूचे सापळे
अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही भरधाव वेगाने वाहन चालविणे हे नित्याचेच झाले आहे पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात सोमवारी (दि.25) स्कॉर्पिओ गाडी सुमारे 700 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रस्त्यांचा आढावा घेतला असता, वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरावस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली असल्याचे दिसून येते.