कर्जत: खरीप हंगाम मशागतीच्या कामांना वेग
Karjat, Raigad | May 6, 2026 रब्बी पिकांचा हंगाम संपला आल्याने खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी करण्यास सुरवात केली आहे. गतवर्षी ऐन मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. सध्या सूर्य आग ओकत असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. बांधबंदिस्ती राब जाळणे, शेतावर साचलेला पाला पाचोळा गोळा करणे, गवत काढणे आदी अनेक कामांचा वेग वाढला आहे.