पालघर: आमदार राजन नाईक यांनी ग्लोबल सिटी परिसरात भेट देत नागरिकांची साधला संवाद
नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी विरार ग्लोबल सिटी परिसरात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी परिसरातील पाणी, रस्ते गटार आदींसह विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या. परिसरातील नागरिकांच्या या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार राजन नाईक यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी दिले. यावेळी ग्लोबल सिटी परिसरातील नागरीक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.