पोलादपूर: जूनअखेरही पावसाचा लहरीपणा कायम
जून महिना संपत आला तरी महाड तालुयात मान्सूनने अद्याप सातत्यपूर्ण हजेरी लावलेली नाही. संपूर्ण जून महिनाभर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासन चिंतेत होते. अखेर २१ जून रोजी पावसाचे आगमन झाल्यानंतर तालुयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला दोन दिवस सायंकाळी हजेरी लावणाऱ्या पावसाने २३ जून रोजी अचानक रौद्ररूप धारण करत दिवसभर आणि रात्रभर मुसळधार बरसून तालुयाला अक्षरशः झोडपून काढले.