पोलादपूर: कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्यावर काँकिटीकरण कामाला गती
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या मार्गावर सन 2005 च्या अतिवृष्टीमध्ये 105 फूट लांब रस्ता खचलेला होता. या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून सातत्याने रस्ता खचण्याचे ग्रहण सुटता सुटेना, मात्र यावर्षी या रस्त्यावर कॉक्रिटीकरण करून टेक्नॉलॉजीचा वापर करत रस्ता दुरुस्ती होणार असल्याने गेल्या वीस वर्षाचे ग्रहण सुटणार अशी भावना व्यक्त केली जात आहे.